मुंबई- विधानपरिषदेचे पहिले
विरोधी पक्षनेते कॉम्रेड माधवराव गायकवाड यांच्या निधनावर सरकारने दाखवलेल्या
उदासिनतेबाबत विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकरवर
दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ आली. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलगिरी
व्यक्त केली.
"कॉ. माधवराव गायकवाड
यांच्या निधनानंतर तब्बल 30 तास सरकारने त्यांच्या कुटुंबाशी कोणताही संपर्क केला नाही.
शिवाय ३० तासांनंतर सरकारने
संपर्क करुन आणखी दोन तास थांबा, असे उत्तर कुटुंबीयांना दिले. त्यावर सरकारने दिलगिरी व्यक्त करावी आणि
संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करावे," अशी मागणी
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली होती.
यानंतर चंद्रकांत पाटील यांनी संपूर्ण घटनेबाबत खेद व्यक्त
केला. "कॉम्रेड माधवराव गायकवाड यांच्या अत्यंसंस्कराबाबत नेमके काय झाले,
याची माहिती घेत आहोत. या सर्व घटनेची दिलगिरी
व्यक्त करुन, नेमके काय झाले हे
संध्याकाळपर्यंत कळेल, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
















